शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:26 PM

बिदरहून आलेला एक जण लातुरात पॉझिटिव्ह तर दुसरा उदगीर शहरातील

लातूर : शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तर दुसरा उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २९ व्यक्तींचे स्वॅब गुरुवार रात्रीपर्यंत तपासणीसाठी आले होते. त्यापैकी  २७  व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह व एका  व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे.उदगीर उपजिल्हा रुग्णालय येथुन एकुण ३६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असून त्यापैकी  ३५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह व     एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  चाकुर येथील दोन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कासारशिरसी येथील ६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले, त्यापैकी ४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व २ व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत. मुरुड येथील ७ पैकी ७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहमदपूर येथील ९ स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी  ६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३ अहवाल प्रलंबित आहेत.  लातूर स्त्री रुग्णालयातून ६ पैकी ६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातूर जिल्ह्यातील असे एकुण ९५ स्वॅब तपासणीसाठी आले, त्यापैकी ८७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून २ अहवाल पॉझिटिव्ह तर ६ प्रलंबित आहेत, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.

बिदरहून आलेला एकजण लातुरात पॉझिटिव्ह ....

लातुरात उपचार घेत असलेला नवा रुग्ण बिदर येथील असून तो लातूर येथील लेबल कॉलनीत आपल्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. तर दुसरा उदगीर येथील असून हनुमान कट्टा परिसरातील रहिवासी आहे. दोघांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध आरोग्य विभागाच्या वतीने घेतला जात आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णाचा आलेख ७३ वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर