शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

CoronaVirus : मृतदेहांची अदलाबदल! अंत्यसंस्कारानंतर जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा बाहेर काढावं लागलं पार्थिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 21:19 IST

एकाच मृतदेहावर दोनवेळा अंत्यसंस्कार! ...मग चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव आपल्या गावी नेले.

लातूर- मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजल्यानंतर अंत्यसंस्कार झालेले पार्थिव पुन्हा जमिनीतून बाहेर काढण्यात आले आणि ते संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकारामुळे एकाच पार्थिवावर दोन वेळा अंत्यसंस्कार करावे लागले. ही घटना गुरुवारी येथे घडली. (CoronaVirus exchange of corpses; After the funeral, JCB had to take dead body out)

जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात असलेल्या शेळगाव येथील धोंडिराम सदाशिव तोंडारे (६५) हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी उदगीर येथे नेण्यात आले होते. तेथून त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. याचदरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील आबासाहेब सखाराम चव्हाण (४५) यांचाही मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव तोंडारे यांचे समजून शेळगाव येथे आणण्यात आले होते आणि त्यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कारही झाले. तर चव्हाण म्हणून तोंडारे यांचे पार्थिव अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथे नेण्यात आले. हातोल्यातील नातेवाईकांना संबंधित मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नाही, असे लक्षात आल्यानंतर, त्यांनी तो ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर आरोग्य यंत्रणेची पळापळ उडाली.

CoronaVirus : भारतात खतरनाक झालाय कोरोनाचा डबल म्यूटेंट, सरकारनं सांगितलं...

अखेर शेळगाव येथील धोंडिराम तोंडारे यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयातून शेळगाव येथे आणण्यात आला. त्यांच्यासोबत चव्हाण यांचे नातेवाईकही शेळगावला पोहोचले. तिथे अंत्यविधी करण्यात आलेला चव्हाण यांचा मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला. यानंतर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव आपल्या गावी नेले.

नातेवाईकांनी चुकून नेला मृतदेह -धोंडिराम सदाशिव तोंडारे व आबासाहेब सखाराम चव्हाण या दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होते. पहिल्यांदा तिथे आलेल्या तोंडारे यांच्या नातेवाईकांनी चुकून आबासाहेब चव्हाण यांचे पार्थिव नेले. ही बाब त्यांच्या मुलांनी लेखी दिली आहे. दरम्यान, आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला, असे येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी म्हटले आहे.

CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूरDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर