शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : उदगीरमधील कोरोना बाधित वयोवृद्ध महिलेचा मृत्यू, चौबारा परिसर सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 20:49 IST

CoronaVirus : उदगीरमध्ये कोरोनाबाधित वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.

लातूर :  उदगीर शहरातील ७० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. मधुमेह व अन्य आजारांमुळे त्या महिलेला अत्यवस्थ वाटू लागल्याने २३ एप्रिल रोजी रात्री उशिरा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी तिचा स्वॅब घेण्यात आला. दरम्यान, शनिवारी सकाळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. पाठोपाठ दुपारपर्यंत व्हेंटिलेटरवर असलेल्या सदर महिलेचा मृत्यू झाला.

यापूर्वी परराज्यातील ८ यात्रेकरू बाधित निघाले होते. ते सर्वजण गेल्या आठवड्यात कोरोनामुक्त झाल्याने समाधान होते. परंतु, उदगीरमध्ये कोरोनाबाधित वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. उदगीर शहरातील हा पहिलाच रूग्ण असून, सदर महिलेचा प्रवास इतिहास तपासला जात असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने सांगितले.

उदगीरचा चौबारा सीलसदर महिला वास्तव्याला असलेल्या किल्ला गल्लीतील चौबारा परिसर पोलिसांनी सील केला आहे. सदरील भागात सर्वांच्याच येण्याजाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मृत्यू झालेल्या महिलेचे कुटुंबीय व त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. कुटुंबातील ५ जणांना क्वारंटाईन केले आहे.

लागण पसरू नये यासाठी यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देशकोरोनाची लागण पसरणार नाही याची काळजी आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. ते म्हणाले, सदरील मृत्यू झालेल्या महिलेचा संदर्भ परराज्याशी आहे का, याचा तपास यंत्रणा घेत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही देशमुख म्हणाले़ दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही तातडीने आरोग्य यंत्रणांशी संवाद केला. मृत महिलेच्या कुटुंबातील व संपर्कात आलेल्या सर्वांनाच क्वारंटाईन करावे. तसेच लागण कशी झाली याचा सोर्स तातडीने कळला पाहिजे, असेही राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.

संसर्ग नेमका कसा झाला ?मृत्यू झालेली कोरोनाबाधित महिला आपल्या परिवारासह उदगीरमध्येच राहते़ सदरील महिलेला २३ एप्रिल रोजी रात्री ९.२० वाजता शासकीय रूग्णालयात दाखल केले होते़ त्याच्या सुमारे तासभर आधी कोरोनाबाधित महिलेच्या शेजारी राहणारी ३५ वर्षीय महिलासुद्धा परराज्यातून घरी परतली होती. तिच्याशी मृत्यू झालेल्या महिलेचा संपर्क झाला होता किंवा नाही, हे अजूनही स्पष्ट झालेले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने म्हणाले़ त्यामुळे आरोग्य यंत्रणा मृत्यू झालेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून व कसा झाला, याचा शोध घेत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर