coronavirus : लातूर जिल्ह्यात ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 21:13 IST2020-06-14T21:13:12+5:302020-06-14T21:13:38+5:30
लातूर शहरातील ३, निलंगा व उदगीर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

coronavirus : लातूर जिल्ह्यात ५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
लातूर : जिल्ह्यात रविवारी आणखी ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, बाधित रुग्णांचा आलेख आता १९१ वर पोहोचला आहे.
रविवारी आढळलेल्या ५ रुग्णांमध्ये लातूर शहरातील ३, निलंगा व उदगीर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत रविवारी ६० व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, तिघा जणांचे अहवाल अनिर्णित, ५ पॉझिटिव्ह तर २१ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. आता जिल्ह्यात ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.