coronavirus : लातूर जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह; ७ जणांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 21:59 IST2020-06-23T21:59:15+5:302020-06-23T21:59:35+5:30

उदगीर येथील ४ आणि लातूर येथील तिघांनी कोरोनावर मात केली आहे.

coronavirus: 10 positive in Latur district; 7 defeated Corona | coronavirus : लातूर जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह; ७ जणांची कोरोनावर मात

coronavirus : लातूर जिल्ह्यात १० पॉझिटिव्ह; ७ जणांची कोरोनावर मात

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवारी आणखीन १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, आता बाधित रुग्णांचा आलेख २४५ वर गेला आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये लातूर शहरातील ४, उदगीर येथील १, औसा ४ आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथील १ अशा एकूण १० रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी उदगीर येथील ४ आणि लातूर येथील तिघांनी कोरोनावर मात केली आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी एकूण ९१ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १० पॉझिटिव्ह, १० अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, मंगळवारी ७ रुग्णांना सुटी मिळाली असून, त्यात उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील चौघे एमआयडीसी कोविड सेंटरमधून ३ अशा एकूण ७ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आता जिल्ह्यात ७४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: coronavirus: 10 positive in Latur district; 7 defeated Corona