एकुरका गाव बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:08+5:302021-04-08T04:20:08+5:30

राज्यमंत्री संजय बनसोडे मुंबई येथून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी, आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. जळकाेट तालुक्यातील एकुरका ...

Corona's 'hotspot' | एकुरका गाव बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

एकुरका गाव बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

राज्यमंत्री संजय बनसोडे मुंबई येथून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी, आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. जळकाेट तालुक्यातील एकुरका गाव पूर्णतः सील करण्यात आला आहे. गावातील उर्वरित लोकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी सांगितले.

मंगळवारी ४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात २२ जणांचा अहवाल काेराेना पॉझिटिव्ह आले. तर बुधवारी ३२ जणांची चाचणी घेण्यात आली त्यात १० जणांचा अहवाल कोराेना पॉझिटिव्ह आला आहे. दाेन दिवसात एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांना जळकोटच्या सीसीसी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. वांजरवाडा, चेरा येथे लसीकरण सुरू आहे. याबाबत तहसीलदार

संदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या जळकोट शहरात जिल्हा परिषद शाळेत लसीकरणाचे काम सुरू केले आहे. ४५ पेक्षा जास्त असलेल्या लोकांना सरसकट कोराेनाची लस देण्याचे काम सुरु आहे. जळकाेट येथील दुकानदार, दुकानातील सर्व व्यक्तींनी आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.

Web Title: Corona's 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.