यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुजाता पाटील, तर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, किल्लारी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे, वैद्यकीय अधिकारी सचिन बालकुंदे, डॉ. दोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी सचिन बालकुंदे, डॉ. दोडके, डॉ. अश्विनी सूर्यवंशी, डॉ. सनातन, डॉ. अजित धुमाळ, डॉ. अंजली निचाले, राजीव कुमार शेळके, एस. एस. कदम, काशिनाथ भातमोडे, शेषराव निरगुडे, विजयश्री शिंदे, चंदा गंगात्रे, ममता खरात, श्रीमती हांडे, सुवर्णा बिराजदार, मनीषा वाघमारे, ए. यू. तांबाळकर, अर्चना गायकवाड, एस. व्ही. दोडतले, पी. व्ही. मोरे, बालाजी वाघमारे, शरद कसपटे, तेजस उस्तुरे, गणराज हाके, राजू बनसोडे, कृष्णा बनसोडे, जयराम गायकवाड, कमलाकर चव्हाण, गुलाम शेख, राजू बनसोडे, गुड्डूसाहेब शेख, रामचंद्र सोनवणे, विठ्ठल करदुरे, विशाल नरवाडे, नागनाथ सूर्यवंशी, आदींचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आरोग्यसेविका विजयश्री शिंदे यांनी प्रास्ताविक, तर एस. व्ही. दोडतले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सचिन बालकुंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन शांताबाई बाबूराव बिराजदार यांच्या स्मरणार्थ विवेक बिराजदार यांनी केले होते.
किल्लारी ग्रामीण रुग्णालयात कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST