corona virus : 'औषधे बाहेरून विकत आणायला लावली'; सरकारी दवाखान्यातील कोरोना रुग्णांची लुट तहसीलदारांनीच उघडकीस आणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 16:48 IST2021-04-27T16:46:26+5:302021-04-27T16:48:12+5:30

corona virus : औषधे असतानाही रुग्णांना ठरावीक औषधी दुकानामधून औषधे आणण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून चिठ्ठी दिली जाते

corona virus : ‘Forced to bring in drugs while out’; Tehsildar revealed the robbery of patients in government hospitals | corona virus : 'औषधे बाहेरून विकत आणायला लावली'; सरकारी दवाखान्यातील कोरोना रुग्णांची लुट तहसीलदारांनीच उघडकीस आणली

corona virus : 'औषधे बाहेरून विकत आणायला लावली'; सरकारी दवाखान्यातील कोरोना रुग्णांची लुट तहसीलदारांनीच उघडकीस आणली

ठळक मुद्देमेडिकलशी संगनमत दिसत असून, डॉ. दिनकर पाटील यांच्या नावाने दिलेल्या अनेक चिठ्ठ्यांमुळे गडबड लक्षात आली आहेया संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

निलंगा : उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा साठा मुबलक असतानाही एका डॉक्टरने सुमारे २१५ रुग्णांना एकाच खासगी मेडिकलमधून औषधे आणायला लावल्याचा गंभीर प्रकार तहसीलदार गणेश जाधव यांनी सोमवारी उघडकीस आणला आहे. दरम्यान, चिठ्ठ्यांवर नाव असलेले डॉ. दिनकर पाटील आणि महाजन मेडिकल यांची सदर प्रकरणात चौकशी सुरू आहे.

औषधे असतानाही रुग्णांना ठरावीक औषधी दुकानामधून औषधे आणण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून चिठ्ठी दिली जाते, अशा तक्रारी तहसीलदारांकडे आल्या होत्या. त्यावरून तहसीलदार गणेश जाधव यांनी रुग्णालयास भेट देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी चर्चा केली. त्यानंतर महाजन मेडिकलची तपासणी केली असता डॉ. पाटील यांच्या नावाच्या २१५ चिठ्ठ्या आढळून आल्या. तहसीलदारांनी दोन तास बिलांची चौकशी केली. रुग्णालयातील औषधांचा साठा तपासला. तसेच यावेळी एक रुग्ण बरा होऊन सुटी मिळाल्याने महाजन मेडिकलमधून आणलेली शिल्लक औषधे परत करण्यासाठी आला होता. शासकीय रुग्णालयात औषधे असतानाही नऊ हजार ७१३ रुपयांची औषधे संबंधित रुग्णाकडून बाहेरून मागविल्याचे समक्ष तपासणीत आढळले. सदरील तपासणी करताना मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, नायब तहसीलदार अरुण महापुरे, मनोज बरमदे उपस्थित होते.

रुग्ण, नातेवाइकांनी तक्रारी कराव्यात...
तहसीलदार गणेश जाधव म्हणाले, मेडिकलशी संगनमत दिसत असून, डॉ. दिनकर पाटील यांच्या नावाने दिलेल्या अनेक चिठ्ठ्यांमुळे गडबड लक्षात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अन्न औषध प्रशासन यांच्या मार्फतही चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे. रेमडेसिविर अथवा कोणत्याही औषधांसाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब कोणी करत असेल तर संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार जाधव यांनी केले आहे. या संदर्भात, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले, आजवर मयत झालेल्या रुग्णांना किती रेमडेसिविर देण्यात आले. त्यात बाहेरून किती मागविले त्यात २२ तारखेला १८ रुग्ण कशामुळे दगावले, याचा सूक्ष्म अहवाल जिल्हा रुग्णालयाने द्यावा.

Web Title: corona virus : ‘Forced to bring in drugs while out’; Tehsildar revealed the robbery of patients in government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.