लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?
कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला चक्कर, घाम येण्याची शक्यता असते. तसेच काही जणांना ॲलर्जीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रावर निगराणीखाली राहावे लागते. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचारीही सेवेत आहेत.
लस हेच औषध
कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला तरी धोका टळलेला नाही. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस प्रभावी ठरत आहेत.
कोरोना रोखण्यासाठी सध्या तरी लस हे प्रभावी औषध आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.
लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली राहणे गरजेचे असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर केंद्राबाहेर लागलीच पडू नये. चक्कर, ॲलर्जी असण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास थांबावे. - डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी