व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:33+5:302021-04-01T04:20:33+5:30
मुरुडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवसात कोविड ...

व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
मुरुडमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवसात कोविड चाचणी करून घेणे अनिवार्य करण्यात आले. या निर्णयाची मंगळवारपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच रस्त्यावर फिरणाऱ्यांनी मास्क वापरणे तसेच फिजिकल डिस्टन्स राखणे बंधनकारक आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी तीन दिवसात कोविड चाचणी करून घ्यावी. चाचणी प्रमाणपत्र न दाखविल्यास त्यांचे दुकान बंद करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी दुकानात सॅनिटायझर ठेवावे. शहरातील डॉक्टरांनी कोविडसदृश रुग्ण दिसून आल्यास त्यास चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले. औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी देण्यास मनाई करण्यात आली आहे. या बैठकीला मुरुड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सरपंच अभयसिंह नाडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.