व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:04+5:302021-03-24T04:18:04+5:30
मागील काही दिवसात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी १८ मार्च रोजी आदेश जारी ...

व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
मागील काही दिवसात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी १८ मार्च रोजी आदेश जारी केला आहे. शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी चाचण्या करून घ्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या अनुषंगाने शहरातील व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त अमन मित्तल यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. महानगरपालिकेच्या वतीने व्यापारी,व्यावसायिक आणि दुकानदारांच्या तपासण्या करून घेण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी औषधी भवन, साळे गल्लीतील यशवंत शाळा, औसा रोडवरील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनचे केंद्र व समाजकल्याण वसतिगृह या चार ठिकाणी चाचण्या करता येणार आहेत. त्यानुसारमहापालिकेने चाचण्या सुरू केल्या आहेत.
तारखेनुसार नियोजन करावे...
शहरातील औषधी भवन, साळे गल्लीतील यशवंत शाळा, औसा रोडवरील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनचे केंद्र व समाजकल्याण वसतिगृह या चार ठिकाणी चाचण्या करता येणार आहेत. त्या- त्या भागातील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी एकाच केंद्रावर गर्दी होवू नये यासाठी तारखेनुसार नियोजन करावे. व्यापारी आणि संघटनांच्या नियोजनानुसार आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्येकाने तपासण्या करून घ्याव्यात, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.