लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:55+5:302021-04-06T04:18:55+5:30
काय सुरू राहील... रुग्णालये व सर्व वैद्यकीय सेवा, किराणा, सर्व खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील. रेल्वे, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस ...

लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य
काय सुरू राहील...
रुग्णालये व सर्व वैद्यकीय सेवा, किराणा, सर्व खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील.
रेल्वे, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसेस सुरू राहतील.
कृषिसंबंधित सर्व सेवा, बी-बियाणे, फर्टिलायझर्स, ट्रॅक्टर, स्पेअर पार्टस् आणि दुरुस्ती सुरू राहील.
साहित्य पार्सल सेवा, पेट्रोलपंप, एलपीजी गॅस, पंक्चर दुकाने सुरू राहतील.
अधिकृत माध्यमांचे कामकाजही सुरू राहील.
वृत्तपत्रांचे वितरण सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत आठही दिवस करता येईल.
विद्यापीठ बोर्ड परीक्षा नियमांच्या अधीन राहून घेता येतील.
कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून उत्पादनाशी निगडित कारखाने सुरू राहतील.
काय बंद राहील...
सर्व धर्मस्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत.
सर्व शाळा-महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस,
सार्वजनिक मैदाने, उद्याने, उपरोक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानात शारीरिक अंतर राखणे अनिवार्य राहील.
जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, सर्व हॉटेल्स, खानावळी, बार, परमिट रुम तसेच हेअर सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील.
लसीकरण अनिवार्य...
घरोघरी पार्सल सेवा देणारे, अत्यावश्यक सेवा देणारे दुकानाचे मालक व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे अथवा लस घेईपर्यंत १५ दिवसाचा वैध आरटीपीसीआर कोरोना निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा लागेल.
विनामास्क आढळल्यास ५०० रुपयाचा दंड
सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास ५०० रुपयाचा दंड ठोठावला जाणार आहे. फार्मा, मेडिकल कंपन्या, खासगी बँका, दूरसंचार सेवा वगळता इतर सर्व खासगी कार्यालये बंद राहतील.
पार्सल सेवेसाठी आरटीपीसीआर चाचणी आवश्यक
पार्सल सेवा देणाऱ्यांनी लस घ्यावी, तोपर्यंत १५ दिवसासाठी वैध असलेला आरटीपीसीआर नकारात्मक चाचणी अहवाल सोबत ठेवावा, १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार असून, प्रमाणपत्राविना आढळणाऱ्या कर्मचाऱ्यास हजार रुपये दंड तर त्याच्या आस्थापनाला दहा हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास आस्थापनाधारकांचा परवाना महामारी संपेपर्यंत रद्द केला जाईल.
लग्नकार्य स्वगृही अन् चाचणी आवश्यक...
मंगल कार्यालये बंद राहणार असून, केवळ ५० जणांच्या उपस्थितीत स्वत:च्या घरी लग्नकार्य पार पाडता येईल. कार्यात सहभागी होणाऱ्या सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे अथवा लस घेईपर्यंत सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांकडून हजार रुपये व आयोजकांकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल.
अंत्यविधीला २० जणांची परवानगी
अंत्यविधीला पूर्वीप्रमाणेच २० जणांची परवानगी असेल.
खाद्यपदार्थ विक्रेते
रस्त्याच्या शेजारी खाद्यपदार्थ पार्सल विक्री करता येईल. परंतु, त्याच ठिकाणावर खाण्यावर प्रतिबंध असेल. मात्र शुक्रवारी रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही सेवाही पूर्णपणे बंद राहील.