शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ७८ हजार जणांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:18 IST2021-02-14T04:18:53+5:302021-02-14T04:18:53+5:30
दरम्यान, सोलापूर येथे स्वॅब तपासणीस सुरुवात झाल्याने लातूर ते पुणे हे अंतर अधिक असल्याने येथील स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात ...

शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ७८ हजार जणांची कोरोना चाचणी
दरम्यान, सोलापूर येथे स्वॅब तपासणीस सुरुवात झाल्याने लातूर ते पुणे हे अंतर अधिक असल्याने येथील स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात येत असे. मात्र, वेळेवर अहवाल येत नसल्याने पुन्हा अडचण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आरोग्य विभागास सातत्याने पाठपुरावा करावा लागत असे.
प्रयोगशाळेअभावी होत असलेली अडचण पाहून वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत प्रयोगशाळा उभारणीसाठी पुढाकार घेऊन राज्य शासनाकडून जवळपास ४० लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे हाफकिनमार्फत प्रयोगशाळा निर्मितीच्या कामास गती मिळाली आणि एप्रिलअखेरीस लातूरमध्ये प्रयोगशाळा सुरू झाली.
०१ जिल्ह्यातील एकूण लॅब
७८ हजार ५२२ आतापर्यंत झालेले टेस्टिंग
१२ जणाचा स्टाफ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत एक प्रमुख आणि १२ टेक्निशियन आहेत. टेक्निशियन हे कंत्राटी असून त्यांची नियुक्ती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.
एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाही...
आजपर्यंत करण्यात आलेल्या स्वॅब तपासणीच्या अहवालामध्ये एकही चूक आढळून आली नाही. त्यामुळे मेपासून येथील प्रयोगशाळा सातत्याने कार्यरत आहे.
अहवालात त्रुटी न आढळल्याने कुठलीही तक्रार आली नाही. त्यामुळे कुठलीही अडचण आली नाही. प्रयोगशाळेतील तपासणीत कोरोनासंदर्भातील व्यवस्थित माहिती समजू शकते.
लॅबचे पुढे काय?...
सध्या येथील प्रयोगशाळेमध्ये कोरोनाची चाचणी होत आहे. शासनाच्या सूचना आल्यास आणि आवश्यक साहित्य उपलब्ध झाल्यास भविष्यात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराच्या तपासण्याही करता येऊ शकतात.
राज्य शासनाकडून निधी उपलब्ध...
वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पुढाकाराने वैद्यकीय विज्ञान संस्थेत प्रयोगशाळा सुरू झाली. त्यासाठी राज्य शासनाकडून जवळपास ४० लाखाचा निधी उपलब्ध झाला. शासनाच्या हाफकिन संस्थेमार्फत प्रयोगशाळेसाठीचे साहित्य देशातील विविध भागातून खरेदी करण्यात आले.