जिल्ह्यात २ हजार ८ व्यक्तींची कोरोना चाचणी ; २७ जण आढळले पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:31+5:302021-01-08T04:59:31+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १२२७ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात ११ जणांचा अहवाल कोरोना ...

जिल्ह्यात २ हजार ८ व्यक्तींची कोरोना चाचणी ; २७ जण आढळले पॉझिटिव्ह
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १२२७ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात ११ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ७८१ व्यक्तींची करण्यात आली. त्यात १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या रुग्णालयात ३२१ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, २१ जणांची गुरुवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने सुट्टी देण्यात आली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७० टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.८ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे रुग्ण संख्या कमी झालेली आहे. डिसेंबरच्या तुलनेत या वर्षातील जानेवारी महिन्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. २०२० मधील नोव्हेंबर महिन्यापासून रुग्ण संख्येत घट झालेली आहे. यामुळे लातूर शहरातील अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत.