शासकीय कार्यालयात कोरोना प्रतिबंधक उपायोजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:19+5:302021-02-17T04:25:19+5:30
तालुक्यात कोरोना चा प्रभाव आगस्ट सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर होता त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये तो प्रभाव ...

शासकीय कार्यालयात कोरोना प्रतिबंधक उपायोजना बंद
तालुक्यात कोरोना चा प्रभाव आगस्ट सप्टेंबर मध्ये मोठ्या प्रमाणावर होता त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मध्ये तो प्रभाव कमी झाला होता. मात्र हे असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व कार्यालयांना कोरोणा प्रतिबंधक उपाय योजना अंमलबजावणी करण्याविषयी सक्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना शासकीय कार्यालयाने केराची टोपली दाखवली व सूचना पालन केले नसल्याने इतर नागरिकही मुक्तपणे फिरत आहेत. तालुक्यात असलेल्या ३८ कार्यालयापैकी लोक संपर्काचे कार्यालय असलेले नगर परिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक, उपविभागीय कार्यलयात, पोलीस स्टेशन या कार्यालयामध्ये सॅनिटायझर आढळून आले नाही. केवळ रिकाम्या बाटल्या व स्टँड होते. सद्यस्थितीत तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या २५ वर पोहचली आहे.