कोरोनामुळे डोळे उघडले; शहरासह ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:12+5:302021-06-30T04:14:12+5:30
ग्रामीण भागातही सुविधा वाढल्या ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडसह अन्य बेडची सुविधा निर्माण करण्यावर आरोग्य प्रशासनाने भर दिला. ...

कोरोनामुळे डोळे उघडले; शहरासह ग्रामीण भागात आरोग्य सुविधा वाढल्या!
ग्रामीण भागातही सुविधा वाढल्या
ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडसह अन्य बेडची सुविधा निर्माण करण्यावर आरोग्य प्रशासनाने भर दिला. आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रातही किमान दहा बेड ऑक्सिजनेटेड करण्यावर भर आहे.
आरोग्य संस्थांचे बळकटीकरण
कोरोनाच्या महामारीवर आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. खासगी दवाखान्यांनीही त्यांच्या रुग्णालयांनी सुविधा निर्माण केल्या आहेत. ग्रामीण, शहरी आरोग्य संस्थांनी रुग्ण सेवेसाठी बळकटीकरण केले आहे. यामुळे आरोग्य सेवा सुलभ झाली आहे.
सुविधा वाढविल्या
शासकीय सर्वच आरोग्य संस्थांमध्ये सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्व संस्था मिळून २६ व्हेंटिलेटर होते. आता ही संख्या दोनशेच्यावर गेली आहे. अडीचशेच्या आसपास आयसीयू बेड होते. तर ही संख्या ८५० वर आहे. त्याचबरोबर सरकारी व खासगी ऑक्सिजन निर्मितीचे प्लांटही उभारले आहेत. - डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक.