शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:13 IST

वजन वाढले कारण, मैदानी खेळ, सायकलिंग बंद आहे. मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपसमोरचा ऑनलाईन वर्गामुळे वेळ वाढलेला आहे. टीव्हीसमोर असल्याने ...

वजन वाढले कारण,

मैदानी खेळ, सायकलिंग बंद आहे. मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपसमोरचा ऑनलाईन वर्गामुळे वेळ वाढलेला आहे.

टीव्हीसमोर असल्याने खाण्यावर नियंत्रण राहिले नाही. होम डिलिव्हरी सुरू झाल्याने हॉटेलमधील चमचमीत पदार्थ मागविले जात आहेत.

टीव्ही पाहत पिझ्झा, बर्गरवर ताव मारला जात आहे. फास्टफूड खाद्य पदार्थात वाढ झाल्याने वजन वाढले आहे.

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

घरातल्या घरात खेळणे, योगासन करणे आवश्यक आहे. तेवढ्यापुरताच मोबाईल, लॅपटॉपचा वापर करणे, खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

कोरोना नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आहे. वॉकिंग ट्रॅक सुरू झाले आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना सोबत घेऊन स्वत:ही व्यायाम करायला हवा. जेणेकरून मुलांचे वजन कमी होईल.

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना वेळ देऊन त्यांना एकाकी वाटणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बदलत्या जीवनशैलीचा अवलंब करताना काळजी घ्यावी.

लहान मुलांचे डॉक्टर म्हणतात...

मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीचा अति वापर आहे. त्याचबरोबर खाण्यातही वाढ झाली आहे. परिणामी, मुलांचे वजन वाढले आहे. त्यामुळे अनावश्यक स्क्रीन टाईम कमी करणे, फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढविणे आणि खानपानावर नियंत्रण ठेवणे हे पर्याय वजन कमी करण्यासाठी आहेत. - डॉ. वर्धमान उदगीरकर

बदलती जीवनशैली स्वीकारावी लागेल. परंतु, शारीरिक हानी होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांच्या व्यायामाकडे लक्ष द्यावे लागेल. या बाबी करण्यासाठी पालकांना मुलांसाठी आता जास्तीचा वेळ राखून ठेवण्याची गरज आहे. - डॉ. शिवप्रसाद मुंदडा

मुले टीव्ही, मोबाईल सोडतच नाहीत

ऑनलाईन वर्ग केल्यानंतरही मुलं मोबाईल सोडत नाहीत. मोबाईल बंद झाला तर टीव्हीपुढे बसतात. त्याला विरोध केला तर जेवण करीत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यांना समजावण्याची मोठी कसरतच आहे. - अंगद किनीकर

घरातच असल्यामुळे मुलांचे वजन वाढले आहे. टीव्ही आणि मोबाईल पाहण्याची सवय झाली आहे. बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही पाहू देतो. त्यावर बंधन घालावे लागेल. - विष्णू कांबळे