कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:33+5:302021-03-07T04:18:33+5:30
महिला तक्रार निवारण केंद्राकडे नाेंद असलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये तब्बल ५५७ महिला छळांच्या घटना घडल्या आहेत. भराेसा सेलकडे प्राप्त ...

कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला
महिला तक्रार निवारण केंद्राकडे नाेंद असलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये तब्बल ५५७ महिला छळांच्या घटना घडल्या आहेत. भराेसा सेलकडे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी १६९ प्रकरणांत तडजाेड झाली. ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे, तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. ८ प्रलंबित आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात जिल्ह्यात जवळपास ४८५ प्रकरणांची नाेंद झाली आहे. २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या काळात सर्वाधिक काैटुंबिक हिंसाचार हा जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये झाला आहे. या वर्षभरात तब्बल ६२९ प्रकरणे दाखल झाली आहेत, तर जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ या काळात जळपास ३५ प्रकरणे महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा’ सेलकडे नाेंदविण्यात आल्या. काही प्रकरणांत मिलन घडविण्यात यश आले.