शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

Corona In Latur : ना मास्क ना सॅनिटायझर ; लातूर जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:53 IST

स्वयंसेविकांना सुरक्षेची कोणतीच साधने देण्यात आली नसल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देलातूर जिल्ह्यातील 1 हजार 800 आशा देताहेत आरोग्य सुरक्षेचा सल्लाखेडोपाडी जाऊन देत आहेत माहिती

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. शहरी व ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी घरोघरी जाऊन हात कसे स्वच्छ धुवावेत, बाहेर गावाहून कोणी आले का, काही लक्षणे असतील तर त्यांना रुग्णालयात पाठविण्याचे काम करीत आहेत, दररोज त्यांचा शेकडो लोकांशी संबंध येतो. मात्र याच स्वयंसेविकांना सुरक्षेची कोणतीच साधने देण्यात आली नसल्याने त्यांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

लातूर जिल्ह्यात ग्रामीण भागात जवळपास 1 हजार 690 व शहरी भागात शंभराहून अधिक आशा स्वयंसेविका, गतप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन उत्तम आरोग्याचा सल्ला देण्याचे काम करीत आहेत. तत्पूर्वी त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. हात कसे धुवावेत, घरात कशी काळजी घ्यावी, मुंबई-पुण्यासह अन्य भागातून गावात आलेल्या व्यक्तीची माहिती कशी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. तदनंतर दुसऱ्या दिवसांपासून आशा स्वयंसेविका कामाला लागल्या. पहिल्या दिवशी सोबत आलेले शिक्षक अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी तर गायब झाले, अंगणवाडी सेविकाही अनेक गावात आशासोबत कार्यरत नसल्याची ओरड आहे.

कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेविका सर्वेक्षनाचे काम करीत आहेत, पण त्यांना अजूनही ना मास्क आहेत, ना सॅनिटायझर.घरोघरी जाऊन त्या साबणाने हात धुवून नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तोंडाला ओढणी किंवा रुमाल बांधून इतरांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांची सुरक्षा दुर्लक्षित असल्याचे दिसत आहे.दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी एक आदेश काढला असून दोन मास्क आणि 500 मिली सॅनिटायझर खरेदीला परवानगी दिली आहे.

मास्क, सॅनिटायझर खरेदीचे आदेशजिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी गुरुवारी पत्र काढले आहे. आशा स्वयंसेविका यांनी ग्राम आरोग्य पोषण, स्वच्छता व पाणी पुरवठा समिती मार्फत दोन कापडी मास्क, 500 मिली सॅनिटायझर खरेदी करावेत. तर गतप्रवर्तक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत दोन मास्क, सॅनिटायझर,तालुका समूह संघटक यांनी आपल्या सादिल निधीतून साहित्य खरेदीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतल्याने दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूरHealthआरोग्य