कोरोनाचा संसर्ग वाढल्याने उदगिरातील खाटा फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:32+5:302021-04-11T04:19:32+5:30
बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत ...

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने उदगिरातील खाटा फुल्ल
बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, तहसीलदार रामेश्वर गोरे, पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड, पोलीस उपअधीक्षक डॅनियल बेन, गटविकास अधिकारी महेश सुळे, आदी उपस्थित होते.
उदगिरातील लाईफ केअर हॉस्पिटलला कोविडचे जम्बो सेंटरच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी उदगीरकरांनी केली. शहरात अपुऱ्या खाटा, ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा व रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील अत्यवस्थ रुग्ण उपचारासाठी बिदर, हैदराबादला जात आहेत. मात्र, सर्वसामान्यांना ही बाब परवडणारी नाही, असेही उदगीरकर म्हणाले.
उदगीर उपजिल्हा रुग्णालयात १०६, तोंडार पाटी येथे ११० रुग्ण आहेत. लॉयन्स हॉस्पिटलही फुल्ल झाले आहे. लाईफ केअर येथे ऑक्सिजन व्यवस्थेसह ४५ खाटा असून, तेथीलही खाटा फुल्ल झाल्या आहेत, असे सांगण्यात आले. राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, बसवराज पाटील-नागराळकर, राजेश्वर निटूरे, रमेश आंबरखाने यांनी लाईफ केअर हॉस्पिटलची पाहणी केली. लाईफ केअर हॉस्पिटलच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील-चाकूरकर यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिली.