कोरोनामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांचा यंदा गॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST2021-03-18T04:19:01+5:302021-03-18T04:19:01+5:30
८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी... लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ...

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांचा यंदा गॅप
८ हजार ६७३ पुनर्परीक्षार्थी...
लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ३८९ परीक्षा केंद्र आहे, तर बारावीसाठी २०८ केंद्रे आहेत. या केंद्रावर दहावीचे ४ हजार ३४० विद्यार्थी रिपीटर म्हणून परीक्षा देणार आहेत, तर बारावीचे ४ हजार ३३३ रिपीटर विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने या दोनही परीक्षेची जय्यत तयारी करण्यात आली असून, परीक्षा केंद्रावर कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र; शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा होणार असल्याचे जाहीर केल्याने संभ्रम दूर झाला आहे. सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना परीक्षेसंदर्भात अवगत करण्यात आले आहे. शिवाय, मध्यंतरी नववी, दहावीचे ऑफलाईन वर्ग झाल्याने संकटकाळातही अभ्यासक्रम बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे.
दहावीचे परीक्षार्थी -
२०२० : १, १७, ९४५
२०२१ : १,०५,८३३
बारावीचे परीक्षार्थी
२०२० : ९१,५४०
२०२१ : ७७,७९४