तरुणांमुळेच लहान मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना; हवे नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:28+5:302021-04-13T04:18:28+5:30
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, दररोज हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांच्या वयोगटावर नजर फिरविली ...

तरुणांमुळेच लहान मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोना; हवे नियमांचे पालन
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, दररोज हजारांच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. या रुग्णांच्या वयोगटावर नजर फिरविली असता सर्वाधिक बाधित तरुण आहेत. त्यांचा संसर्ग लहान मुले आणि ज्येष्ठांना होत असल्याचे चित्र आहे.
रविवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात १० हजार १६० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये दोन ते दहा वयोगटातील ४१५ रुग्ण आहेत. शून्य ते एक वर्ष वयोगटात १७ बाधित आहेत. ११ ते २० वयोगटात १ हजार ७२ रुग्ण आहेत. २१ ते ३० वयोगटात २ हजार १४० आणि ३१ ते ४० वयोगटात २ हजार ८१ रुग्ण आहेत. सदर वयोगट सुपरस्प्रेड असून, ४१ ते ५० वयोगटात १ हजार ७५१ रुग्ण आहेत आणि ६० वर्षांपुढील वयोगटातील १ हजार ३२२ रुग्ण उपचार घेत आहेत.
घरी आल्यानंतर ही घ्या काळजी
बाहेरून घरी आल्यानंतर कपडे बाजूला ठेवून ते धुतले पाहिजेत. गरम पाण्याने आंघोळ करूनच घरामध्ये वावरले पाहिजे. घरामधील ज्येष्ठ व मुलांजवळ जाणे टाळायला हवे. सर्दीसारखी लक्षणे असतील तर घरातही मास्क वापरायला हवा. मोबाइल सॅनिटाइझ करावा. ज्येष्ठ व मुलांसोबत गप्पा मारताना सुरक्षित अंतर ठेवावे. तरच आपण कोरोनाला रोखू शकू. ही दैनंदिन काळजी घेणे गरजेचे आहे.