कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक, घराघरांत वाढल्या चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:48+5:302021-07-28T04:20:48+5:30
म्हणून घेतली कार... लॉकडाऊन काळात नातेवाइकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली; पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. ...

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक, घराघरांत वाढल्या चारचाकी
म्हणून घेतली कार...
लॉकडाऊन काळात नातेवाइकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली; पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. मग डोक्यात विचार आला अन् महिनाभरातच कार घेतली.
- अरविंद कदम, कारमालक
........................
प्रवासी वाहनांतून जात असताना अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बघितले. कोरोनाचा धोका वाढत असल्याने खर्च वाढला तरी चालेल म्हणून नवीन कारची खरेदी केली. स्वत:चे वाहन असल्याने आता सुरक्षितता वाढली असून बाहेर जाण्यासाठी चिंता नाही.
- सुबोध पवार, कारमालक
...............................
रोजगारही निघेना...
मी गेल्या दहा वर्षांपासून लातूरमध्ये ऑटाेरिक्षा चालवितो. रोज किमान ८०० रुपये खर्च वजा जाता शिल्लक राहायचे. मात्र लॉकडाऊनपासून व्यवसाय खूपच कमी झाला आहे. रस्त्यावर माणूसच मिळत नाही. जाग्यावरून भरून निघाले तरच चार पैसे होतात. नाही तर खर्च भागविणेही कठीण झाले आहे.
- शब्बीर शेख, ऑटोचालक
............................
उपासमारीची वेळ...
सकाळी सात वाजता घराबाहेर पडलो. दुपारपर्यंत रोजगार निघायचा. दुपारी आराम करून पाच वाजता बाहेर निघालो की पुन्हा किमान ५०० रुपये तरी यायचे. आता संपूर्ण चित्रच उलटे झाले आहे. प्रवासीच मिळत नाहीत. दिवसभर ऑटो चालविला तरी तेल टाकून रोजगारही निघत नाही.
- संतोष शेंडगे, ऑटोचालक
मोटारसायकल चारचाकी
२०१९ २२३२७ २१३०
२०२० २६४१२ ३४२४
२०२१ २८९१७ ३०४२