रोटरी क्लब लातूरतर्फे संगम पार्कची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:41+5:302021-07-19T04:14:41+5:30
लातूर : शहरात संगमेश्वर बोमणे यांच्या स्मरणार्थ संगम पार्कची उभारणी करण्यात आली असून, याचे उद्घाटन मनपा आयुक्त अमन मित्तल ...

रोटरी क्लब लातूरतर्फे संगम पार्कची उभारणी
लातूर : शहरात संगमेश्वर बोमणे यांच्या स्मरणार्थ संगम पार्कची उभारणी करण्यात आली असून, याचे उद्घाटन मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या पार्कमध्ये विविध प्रकारची २६० फळे, फुले व ऑक्सिजन देणारी झाडे लावण्यात आली. पार्कमध्ये वॉकिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस व लहान मुलांसाठी खेळणी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. यावेळी पूजा बोमणे, जयप्रकाश दगडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष नानिक जोधवानी, रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन ॲड. सतीश दिवाण, ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ. सोनकवडे, ॲड. श्रीराम देशपांडे, सतीश बोरा, सुवर्णकार, श्रीकांत कर्वा, श्यामसुंदर मानधना, विक्रमसिंह जाधव, बाबूराव सोमवंशी, राजगोपाल राठी, डॉ. भास्कर बोरगावकर, श्रीमंत कावळे, शंकर इंगळे, संगम कोटलवार, जाधव, पाटील, साळुंके आदी उपस्थित होते. संगम पार्कच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार असल्याचे मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी यावेळी सांगितले. या पार्कच्या निर्मितीसाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचेही सहकार्य लाभले. डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन ॲड. सतीश दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष नानिक जोधवानी यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.