घराचे बांधकाम झाले महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:51+5:302020-12-06T04:20:51+5:30
मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह काही नद्या व नाले मोठ्या प्रमाणात वाहतात. मात्र, लातूर शहर व परिसरात मागील काही ...

घराचे बांधकाम झाले महाग
मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह काही नद्या व नाले मोठ्या प्रमाणात वाहतात. मात्र, लातूर शहर व परिसरात मागील काही वर्षांपासून वाळूचा दर अचानक वाढविण्यात आला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या रॅायल्टीपेक्षा अधिक दर द्यावा लागत असल्याने विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत. एकीकडे वाळूघाटांचा लिलाव केला जात नाही, परिणामी दरच निश्चित झाले नाहीत. त्यामुळे स्थानिकची वाळू ६ ते ७ हजार ब्रासप्रमाणे विक्री होत आहे. तर गंगाखेडची वाळू १२ ते १४ हजार, गुजरात, कर्नाटकातून येणारी वाळू जवळपास १० ते १३ हजार रुपये ब्रासप्रमाणे विक्री केली जात आहे. शिवाय, विटांचे भावही २० टक्क्यांनी वाढले असल्याने अनेकांचे बांधकाम बजेट कोलमडले आहे.
लाॅकडाऊन काळात बांधकामांची संख्या कमी होती. वाहतुकीची अडचण झाल्याने सिमेंट, सळईच्या दरात काही प्रमाणात दरवाढ झाली होती. दिवाळीनंतर सळईच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे, परिणामी घर बांधकामावर परिणाम झाला आहे.
- फरहान सैादागर