कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:00+5:302021-03-27T04:20:00+5:30
केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची पिळवणूक केंद्र सरकारला जागे करण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे. काळे कृषी कायदे, महागाई ...

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे उपोषण
केंद्र सरकारकडून सामान्य जनतेची पिळवणूक
केंद्र सरकारला जागे करण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे. काळे कृषी कायदे, महागाई विरोधात देशभर आंदोलन सुरू असून, केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत आणि सामान्य जनतेची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा निरीक्षक रमेश बागवे म्हणाले.
कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. कृषी कायदे रद्द करावेत, दरवाढ कमी करावी यासाठी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. कृषी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे यावेळी आ. धीरज देशमुख म्हणाले.
कॅप्शन :
कृषी कायद्याविरोधात उपोषण
केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा निरीक्षक रमेश बागवे, आ. धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, ॲड. किरण जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.