उदगीर, निलंगा, अहमदपुरात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:25+5:302021-06-20T04:15:25+5:30

उदगीर येथे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक उद्योगधंद्यांना त्याचा ...

Congress agitation in Udgir, Nilanga, Ahmedpur | उदगीर, निलंगा, अहमदपुरात काँग्रेसचे आंदोलन

उदगीर, निलंगा, अहमदपुरात काँग्रेसचे आंदोलन

उदगीर येथे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक उद्योगधंद्यांना त्याचा फटका बसून महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. एक देश एक बाजारपेठ कायदा २०२०, करार शेती कायदा २०२०, जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा २०२० हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत असताना सरकार याची दखल घेत नसल्याचा निषेध करण्यात आला. निवेदनावर कल्याण पाटील, सिद्धेश्वर पाटील, मंजूरखा पठाण, विजय निटुरे, बाळासाहेब मरलापल्ले, प्रा. शिवाजीराव देवनाळे, अमोल कांडगिरे, मधुकर एकुरकेकर, अभय देशमुख, विजय चवळे, अहमद सरवर, धनाजी मुळे, शशिकांत बनसोडे, संजय पवार, फैजुखाँ पठाण, विनोद सुडे, माधव कांबळे, राजकुमार बिरादार, अविनाश गायकवाड, नाना ढगे, बालाजी पाटील, राम शिळवने, आयुब पठाण, राजकुमार भालेराव, पांडुरंग कसबे, बबिता भोसले, बालिका मुळे, माणिक शिंदे, प्रभाकर पाटील, देवीदास गुर्मे, अनिल मुदाळे, बालाजी पाटील-नेत्रगावकर, अलिम पटेल, अरविंद मोरे, सतीश पाटील, व्यंकट माने, विनोबा पाटील, अनिल लांजे, रामेश्वर बिरादार, नामदेव बिरादार, नीलकंठ मठपती, संतोष बिरादार, धनाजी पवार, ज्ञानेश्वर अपटे, ईश्वर संगमे, श्रीनिवास एकुरकेकर, आदर्श पिंपरे, आशिष ठाकूर, रावसाहेब भालेराव, प्रकाश गायकवाड, धनाजी मुळे, राजकुमार हुडगे, शेख हिसामोद्दिन, श्रीरंग कांबळे, प्रकाश गायकवाड, सद्दाम बागवान, ज्ञानेश्वर बिरादार, संजय शिंदे, संजय काळे, अमजद पठाण, गोविंद गायकवाड, पाशाभाई पठाण, महादेव शिंदे, पवन बिरादार, सुनील सोशी, नंदकुमार पटणे आदीच्या सह्या आहेत .

निलंग्यात शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध...

निलंगा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प दिनाचे औचित्य साधून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र महाविद्यालयासमोर मोदी सरकारने केलेली पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढ, तसेच शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा विरोध व्यक्त करून शेतकरी विरोधी कायद्याची होळी करण्यात आली. हा संकल्प दिन व आंदोलन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अशोक शेटकार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमोल सोनकांबळे, प्रमोद ढेरे, गंगाताई कांबळे, सदानंद सूर्यवंशी, तुषार सोमवंशी, रिझवान शेख, रोहन सुरवसे, गोविंद सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, सोनाजी कदम, रमेश तेलंग, मंगेश इंद्राळे, पावन लामतुरे, संदीप सूर्यवंशी, श्रीपाद यादव, अशोक सुरवसे, रोहित धैर्य, अविनाश बनसोडे, सूरज कांबळे, संतोष सुरवसे, महादेव गायकवाड, गोविंद देशमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress agitation in Udgir, Nilanga, Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.