देवणी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:08+5:302021-06-21T04:15:08+5:30
देवणी : देवणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने संकल्प दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने लागू ...

देवणी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन
देवणी : देवणी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने संकल्प दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने लागू केलेले शेतकरीविरोधी कायदे त्वरित रद्द करण्यात यावेत. तालुक्यातील एकमेव असलेल्या राज्य मार्गाचे काम तोगरी क्राॅस ते लांबोटापर्यंत सुरू असले तरी सध्या ते अर्धवट अवस्थेत झाल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे काम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अजित बेळकोणे, वैजनाथ लुल्ले, मालबा घोणसे, देविदास पतंगे, सुभाष पाटील, जावेद तांबोळी, कृष्णा पाटील, नामदेव मोराळे, प्रताप कोयले, गजानन भोकणीकर, महादेव मळभागे, नीळकंठ भोसले, जाफर मोमीन, जावेद येरवळे, अंकुश माने, बालाजी बिरादार, रमेश भोसले, सतीश तळेगावकर, माधव भोसले, सुनील बिरादार, शिवाजी राठोड, सुनील भोसले, नदीम मिर्झा, रशीद मल्लेवाले, दाऊत उंटवाले, आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांचे निवेदन महसूल प्रशासनातर्फे मंडल अधिकारी अनिता ढगे व सुग्रीव राजे यांनी स्वीकारले. हेडकाॅन्स्टेबल अक्रम शेख अक्रम व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.