इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:08+5:302021-06-09T04:25:08+5:30
रेणापूर : कोरोनाच्या संकटामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात सातत्याने वाढ करत ...

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
रेणापूर : कोरोनाच्या संकटामुळे देशात आर्थिक संकट निर्माण झाले असताना केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात सातत्याने वाढ करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात येऊन संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
इंधन दरवाढीविरोधात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर शहर व तालुका काँग्रेसकडून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पेट्रोल पंपावर सोमवारी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील, माजी सभापती रमेश सूर्यवंशी, रेणाचे संचालक पंडित माने, नगर पंचायतीचे गटनेते पद्म पाटील, नगरसेवक भूषण पनुरे, अनिल पवार, पाशामियाँ शेख, नारायण कापसे, बालाजी जाधव, अजय चक्रे, अरूण पाटील, प्रदीप काळे, सचिन इगे, गणेश कलाल, शरद मोरे, राजकुमार गडगळे, शिवाजी रणदिवे, दयानंद राठोड, अमोल घोडके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असतानाही केंद्रातील मोदी सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेलचे दर वाढवत जनतेची लूट करत आहे. या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात असतानाही भाजप सरकार दरवाढ करून नागरिकांची पिळवणूक करत आहे, असे म्हणत केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
===Photopath===
070621\1443-img-20210607-wa0045.jpg
===Caption===
रेनापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर असलेल्या पेट्रोल पंप वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई विरोधात निषेध व आंदोलन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते