कव्हा येथील विजयी उमेदवारांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:16+5:302021-01-22T04:18:16+5:30
विशेष घटक योजनेसाठी अर्ज करावेत लातूर : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे, शेळी ...

कव्हा येथील विजयी उमेदवारांचा सत्कार
विशेष घटक योजनेसाठी अर्ज करावेत
लातूर : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी विशेष घटक योजनेअंतर्गत दोन दुधाळ जनावरे, शेळी गटाचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वाटप करण्यात येते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सोडत पद्धतीने निवड केली जाणार असून, अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर.डी. पडिले यांनी केले आहे.
मार्जीन मनी योजनेसाठी प्रस्ताव दाखल करा
लातूर : केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेत अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जीन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबत शासनाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रस्ताव २८ जानेवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील खमितकर यांनी केले आहे.
शिष्यवृ्त्ती अर्ज ऑनलाईन सादर करावेत
लातूर : शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१९-२० साठी रि-अप्लाय करण्यासाठी व २०२०-२१ या वर्षासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त यांनी केले आहे.