लातूर : रविवारी भाजपकडून मारहाणीसंदर्भात तक्रार, तर काँग्रेसकडून मतदानासाठी पैशांचे आमिष दाखविल्याची फिर्याद देण्यात आली. यासंदर्भात पहिल्यांदा मारहाणप्रकरणी काँग्रेस उमेदवारावर रविवारी गुन्ह्याची नोंद झाली होती. दरम्यान, मतदानासाठी आमिष दाखविल्याप्रकरणी भाजप उमेदवारासह तिघांवर सोमवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
माताजीनगर येथील महेंद्र प्रदीप हांडे (वय ३५, व्यवसाय शेती) यांनी तक्रारीत म्हटले आहे, प्रभाग १८मध्ये भाजप उमेदवार अदिती पाटील यांना मतदान करण्यासाठी प्रलोभन दाखविण्यात आले. त्यास नकार दिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून संजय गीर, अजित पाटील, आदिती अजित पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या दिवशीही तक्रारसोमवारीही एका कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा प्रभाग ११ मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मतदारांची नावे असलेली चिठ्ठी आणि पैसे व्हिडीओमध्ये दिसत आहेत. परंतु ज्याच्यावर आरोप केला, ती व्यक्ती व्हिडीओमध्ये ते पैसे माझे व्यक्तिगत आहेत. मी कोणाला पैसे वाटण्यासाठी जात नव्हतो, असे सांगत आहे.
Web Summary : In Latur, Congress and BJP candidates filed cross-complaints. BJP alleged assault, while Congress accused them of voter inducement. Police registered cases against candidates from both parties.
Web Summary : लातूर में, कांग्रेस और भाजपा उम्मीदवारों ने एक दूसरे के खिलाफ शिकायतें दर्ज कराईं। भाजपा ने मारपीट का आरोप लगाया, जबकि कांग्रेस ने मतदाताओं को प्रलोभन देने का आरोप लगाया। दोनों दलों के उम्मीदवारों के खिलाफ मामले दर्ज किए गए।