शेंगदाणे, मसूर, चनाडाळीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाल्याने चिंता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:41+5:302021-02-15T04:18:41+5:30
लातूर : महागाई दिवसेंदिवस वाढत असून गत आठवड्याच्या तुलनेत सध्या शेंगदाणे, मसूर डाळ, चनाडाळीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली ...

शेंगदाणे, मसूर, चनाडाळीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाल्याने चिंता !
लातूर : महागाई दिवसेंदिवस वाढत असून गत आठवड्याच्या तुलनेत सध्या शेंगदाणे, मसूर डाळ, चनाडाळीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, शाबुदाण्याचे दर ५ रुपयांनी घसरले आहेत.
सध्या बाजारपेठेत किराणा तसेच भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. आवकही चांगल्या प्रमाणात होत आहे. सध्या शेंगदाणे ११० रुपये, साखर ३६, रवा ३४, गोडेतेल १२०, तूरडाळ ११०, मसूरडाळ १००, मूगडाळ १२०, चनाडाळ ७०, पोहे ३८, मैदा ३४, शाबुदाणा ५५, तर खोबरे १८० रुपये प्रतिकिलो आहे.
भाजीपाला बाजारपेठेत हिरवी मिरची ४० रुपये किलो, फूलकोबी १०, मेथी जुडी ८, पालक जुडी २५, करडई भाजी २०, चुका ८०, पत्ताकोबी १० रुपये, भेंडी ५०, वांगी २०, कारले ४०, दोडका ६०, भोपळा २०, काकडी ३०, गवार ७०, शेवगा ६०, वरणा ४०, चवळी ४०, शिमला ३०, गाजर २५, तोंडले ४०, कोथिंबीर ६०, लिंबू ६०, कांदा ५०, बटाटा १५, लसूण ८५, टोमॅटो १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत. मागणीही चांगली आहे.
गत आठवड्याच्या तुलनेत तूर डाळीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या ११० रुपये प्रतिकिलो असा ठोक दर आहे. त्याचबरोबर मसूर डाळीच्या दरातही १० रुपयांनी वाढ होऊन १०० रुपये किलो असा भाव झाला आहे. मूग डाळीच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, ग्राहक भाजीपाला खरेदी करीत आहेत.
गत आठवड्याच्या तुलनेत सध्या भाजीपाल्यांचे भाव जवळपास स्थिर राहिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बाजारपेठेत भाजीपाल्याला मागणीही वाढली असल्याचे पहावयास मिळत आहे. सध्या बटाट्याला सर्वाधिक मागणी आहे. १५ रुपये किलो दराने विक्री होत आहे.
इंधनाच्या दरात वाढ झाल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे किराणा साहित्याच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. शाबुदाणा ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.
- गोविंद खंडागळे,
दुकानदार
सध्या बाजारपेठेत फळांची आवक चांगली होत आहे. द्राक्षांची आवक सुरू असून, १०० रुपये किलो भाव आहे, तर सफरचंदाचे दर वाढले.
- इस्माईल शेख,
फळविक्रेता
बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचबरोबर मागणीही आहे. त्यामुळे दर जवळपास स्थिर आहेत. बटाट्याला सर्वाधिक मागणी आहे.
- रमेश चोथवे,
भाजीपाला विक्रेता