अहमदपुरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:37 IST2021-02-28T04:37:31+5:302021-02-28T04:37:31+5:30
अहमदपूर शहरातील शाळा-महाविद्यालय सुरु असलल्याने रस्त्यावर विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर ...

अहमदपुरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद
अहमदपूर शहरातील शाळा-महाविद्यालय सुरु असलल्याने रस्त्यावर विद्यार्थ्यांची रेलचेल दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फळे आणि भाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर थांबून विक्री केली. केवळ होलसेल भाजीपाला व्यापार मात्र शंभर टक्के बंद होता. किराणा दुकान, कापड बाजार, हॉटेल्स, जनरल स्टोअर्स, भांडी स्टोअर्स, सराफा बाजारात काही दुकाने व्यापाऱ्यांनी उघडी ठेवल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळच्या सत्रात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. तर दुपारच्या सत्रात हा प्रतिसाद ओसरला. परिणामी, दिवसभरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नगरपरिषदेने सकाळी आठ वाजता जनता कर्फ्यूत सहभागी होण्याचे आवाहन केले हाेते. मात्र, हेच आवाहन शुक्रवारी सायंकाळी केले असते तर सर्वच व्यापारी आपली दुकाने बंद ठेवली असती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.