नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:04+5:302021-03-13T04:35:04+5:30
जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता ...

नळजोडणीच्या कामांबाबत परिपूर्ण आराखडा तयार करावा
जलजीवन मिशन अंतर्गत लातूर जिल्हा आराखडयास मंजुरी देण्यासंदर्भातील बैठक ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, लातूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री देशमुख म्हणाले, ग्रामीण जनतेला शाश्वत पाणी मिळावे म्हणून जल जीवन मिशन हा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र आणि राज्य शासनाच्या सहभागातून सुरू करण्यात आला आहे. मात्र, गावात नळ जोडणी करीत असताना पूर्ण करण्यात आलेल्या नळजोडण्यांचे काम तांत्रिकदृष्टया योग्य आहे, याबाबत बाह्य स्त्रोत्रांकडून ऑडीट करुन घेणेही आवश्यक आहे. जलजीवन मिशन पूर्ण करण्यासाठी लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्हयांना वॉटरग्रीड योजनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. जि.प.चे सीईओ गोयल यांनी लातूरमध्ये यावर्षी ९२ हजार नळजोडण्यांपैकी ८६ हजारहून अधिक नळ जोडणीचे काम पूर्ण झाली असल्याची माहिती सादरीकरणादरम्यान दिली.
प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी : राज्यमंत्री संजय बनसोडे
मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नळ जोडणी करण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.जल जीवन मिशन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात सुलभता यावी यासाठी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्याचे प्रस्तावित असून लवकरच याबाबत पूर्तता करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
आमदार धीरज देशमुख यावेळी म्हणाले, लातूर जिल्हयात दरवर्षी पाऊस कमी पडल्याचे दिसून येते. येणाऱ्या काळात पाण्याची क्षमता कशा पध्दतीने वाढविता येईल याचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे.