शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक ...

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, प्रकल्प आणि डोंगरगाव, हालकीसारखे बंधारे यामुळे तालुक्यात त्रिकोणी ग्रीनबेल्ट निर्माण झाला आहे. मागील वर्षी हे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांनी २ हजार ५०० हेक्टर्समध्ये नवीन ऊसाची लागवड केली आहे. तर ७०० हेक्टर्स खोडवा असा एकंदर ३ हजार २०० हेक्टर्समध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या तारखा आहेत. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुईसपाट झालेल्या ऊसाची मशागत कशी करायची असा प्रश्न पडला आहे.

सर्वाधिक नुकसान या गावात...

तालुक्यातील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात ऊस असला तरी दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, सांगवी घुग्गी, अंकुलगाराणी, उजेड, डोंगरगाव, हालकी, पांढरवाडी, धामणगाव, बोळेगाव, येरोळ, सुमठाणा, डिगोळ, चामरगा , नागेवाडी, कारेवाडी, लक्कडजवळगा, जोगाळा, शिवपूर, थेरगाव, हिप्पळगाव, कांबळगा, शिरूर अनंतपाळ या गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऊस उत्पादनाच्या टनेजमध्ये घट होणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगार ऊसाची तोडणी करताना शेतकऱ्यांची अडवणूक करणार त्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.

हेक्टरी २५ हजारांची मागणी ...

अनेक शेतकऱ्यांनी इतर कोणतीही पिके न घेता केवळ ऊसाची लागवड केली आहे. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील ४५० हेक्टर्स ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. म्हणून हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी व्यंकटराव पाटील, धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार, भाऊराव पाटील यांनी केली आहे.