शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर

By राजकुमार जोंधळे | Updated: May 20, 2024 19:04 IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे.

लातूर : गत सहा महिन्यात साेन्या-चांदीच्या दरात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, आता साेने-चांदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. साेमवारी चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर पाेहचली असून, साेने २४ कॅरेट प्रतिताेळा ७५ हजार ६०० रुपयांवर पाेहचले आहे. दिवाळीपासून चांदी २० हजारांनी वधारली तर साेने १५ हजारांनी वधारले आहे. गत पाच वर्षात चांदीने प्रतिकिलाेला तब्बल ५५ हजारांचा तर साेन्याने दुप्पट परतावा दिला आहे. यातून साेन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची मात्र चांदी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे. दिवाळीमध्ये साेने प्रतिताेळा ६० हजारांवर हाेते. तर चांदी ७० हजारांवर हाेती. युद्धाचा परिणामही गत वर्षभरात साेन्या-चांदीच्या उलाढालीवर, दरवाढीवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अलिकडे साेन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. साेन्यात १५ हजार तर चांदीमध्ये २० हजारांचा वाढ झाली आहे.

साेने-चांदी वधारली; पंधरा हजारांची वाढ...२०१९ मध्ये साेने प्रतिताेळा ४२ हजारांवर हाेते ते २०२४ मध्ये ७५ हजारांवर गेले आहे. २०१९ मध्ये चांदी प्रतिकिलाे ३५ हजारांवर हाेती. आता २०२४ मध्ये ती ९२ हजारांवर पाेहचली आहे. दिवाळीनंतर साेने प्रति ताेळा १५ हजारांनी वधारले आहे. चांदी १७ हजारांनी वधारली आहे.

तरीही खरेदीचा उत्साह...लातूरच्या सराफा बाजारात साेन्या-चांदीचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून, साेने ७५ हजारांवर तर चांदी ९२ हजारांवर गेली आहे. मात्र, साेन्या-चांदीत गुंतवणूक म्हणून अनेक जण खरेदीला प्राधान्य देत आहेत. दिवाळीनंतर साेन्याने १५ हजारांची तर चांदीने १७ हजारांची उसळी घेतली आहे. - महेश शिंदे बाकलीकर, सराफा

पाच वर्षात चांदी ५० हजारांनी वाढली...वर्ष साेने चांदी२०१९ ३५,००० ४२,०००२०२० ४८,६०० ५८,०००२०२१ ४९,१३० ६०,०००२०२२ ५१,६८० ६२,०००२०२३ ६१,२०० ७४,०००२०२४ ७५,००० ९२,०००

टॅग्स :laturलातूरGoldसोनंSilverचांदीMarketबाजार