अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, सिद्धी शुगरचे संचालक सुरज पाटील, अभियंता नागनाथ सगर, शेख उपस्थित होते. यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले, मी आमदार झाल्यानंतर गावचा विकास नक्कीच होईल, असा आत्मविश्वास ठेवून ग्रामस्थ माझ्या पाठीशी राहिले. त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी ५५ लाखांचा निधी गावासाठी दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी देशमुख, बाळासाहेब पाटील, कोंडिबा पडोळे, बी.पी. सैदापुरे, प्रा. द.मा. माने, प्रा. भास्कर माने, विजयकुमार येलमटे, इलियास सय्यद, माउली भांगे, ग्रामपंचायत सदस्य बबन बिलापट्टे, दीपक भराटे, मुख्याध्यापक ज्ञानोबा डोंगरे, माधव सरवदे, प्रशांत पाटील, ख्वाजा किनीवाले, मनोहर खेडकर, ॲड. शंकर भुरकापल्ले, पांडुरंग कोकरे, उत्तम चामे, अफजल शेख, अंबादास श्रीमंगले, रमेश येरमे, सलीम शेख, अविनाश गरडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन उमाकांत स्वामी यांनी केले. आभार संग्राम पवार यांनी मानले.