कमालपूर येथे विविध विकास कामांचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:44+5:302021-04-01T04:20:44+5:30
... तांबाळावाडी येथे सूक्ष्मनियोजन प्रशिक्षण निलंगा : तालुक्यातील तांबाळावाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन प्रशिक्षण घेण्यात ...

कमालपूर येथे विविध विकास कामांचा प्रारंभ
...
तांबाळावाडी येथे सूक्ष्मनियोजन प्रशिक्षण
निलंगा : तालुक्यातील तांबाळावाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोकसहभागीय सूक्ष्मनियोजन प्रशिक्षण घेण्यात आले. प्रारंभी गावातून फेरी काढून शेतकऱ्यांना योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी सभापती राधा बिराजदार, कृषी सहायक इंदुबाई कलबुणे, अनिल सांगळे, माजी सरपंच सुरेश बिराजदार, जाकीर सय्यद, कल्लप्पा बिराजदार, विजय बिराजदार, रमेश बिराजदार, मनोज मटके, गुरुनाथ अणदूरे, संजीव बिराजदार, लोकेश हंगरगे, तुकाराम बिराजदार आदी उपस्थित होते.
...
तांबाळा येथे योगेश महामुनी यांचा सत्कार
निलंगा : तालुक्यातील तांबाळा येथील सुपुत्र तथा मुंबई येथील जीएसटी विभागात राज्य विक्रीकर निरीक्षकपदी कार्यरत असलेले योगेश महामुनी यांचा तांबाळा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शंभोलिंग शिवाचार्य महास्वामी, विजयकुमार महास्वामी, मुख्याध्यापक काशिनाथ साहु, रामराव बोकछडे, सभापती राधा बिराजदार, परमेश्वर कारभारी, उपसरपंच बसवराज पाटील, ओमकार स्वामी, माजी सरपंच शरणप्पा मुळे, मलिंग गोपाळे, महेताब सैदावाले, गुलाब धर्मगुत्ते, सूर्यकांत खुरपे, प्रा. अनिल साहू आदी उपस्थित होते.
...
मुरुड जिल्हा परिषद गटात विकास कामे सुरू
मुरुड : मुरुड येथील जिल्हा परिषद गटात १ कोटी ४० लाखांच्या विविध विकास कामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सोमवंशी, ॲड. श्रीकांत सूर्यवंशी, बी.एन. डोंगरे, प्रा. अंकुश नाडे, रमेश पाटील, मनीषा शिंदे, श्याम गाडे, सुनील पाटील, शिवाजी मरे, प्रवीण गायकवाड, जनक इंगळे, खंडू बिर्ले, संतोष मुरुमकर, सरपंच सिंधू पिंपरे, उपसरपंच विष्णू महानवर, रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनी आयोजित केला होता.