उस्तुरी उपकेंद्रात लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:01+5:302021-04-05T04:18:01+5:30
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी कासार बालकुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यास जावे लागत होते. ...

उस्तुरी उपकेंद्रात लसीकरणाला प्रारंभ
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी कासार बालकुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यास जावे लागत होते. दरम्यान, उस्तुरी येथील ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्राच्या पुढाकारातून शुक्रवारी २ एप्रिल रोजी लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
कासार बालकुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला प्रारंभ झाल्यापासून उस्तुरी येथील नागरिकांना कोरोनाची लस घेण्यासाठी १२ कि.मी. अंतर जावे लागत होते. उस्तुरी येथे आरोग्य उपकेंद्र असून, या उपकेंद्रास उस्तुरी, वाक्सा, चांदोरी आणि चांदोरीवाडी ही चार गावे जोडली आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी उस्तुरी येथील आरोग्य उपकेंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी २०० जणांना लस देण्यात आली. उस्तुरी, वाक्सा, चांदोरीवीडी येथील नागरिक आले होते. उस्तुरी आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशा कार्यकर्ती, जिल्हा परिषद शिक्षक, उस्तुरी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अधिक परिश्रम घेतले.