लोकसहभागातून हेळंब येथे पाणंद रस्ता कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:46+5:302021-05-13T04:19:46+5:30
या कामाचे उद्घाटन सरपंच गोरख सावंत यांच्याहस्ते केले. यावेळी दयानंद लाटे, रवी शिंदे, सुरेश शिंदे, संभाजी लाटे, शशिकांत सावंत, ...

लोकसहभागातून हेळंब येथे पाणंद रस्ता कामास प्रारंभ
या कामाचे उद्घाटन सरपंच गोरख सावंत यांच्याहस्ते केले. यावेळी दयानंद लाटे, रवी शिंदे, सुरेश शिंदे, संभाजी लाटे, शशिकांत सावंत, संतोष लाटे, धनराज नष्टे आदी उपस्थित होते.
हेळंब येथील पाणंद रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतीकडे ये- जा करणे कठीण होत असे. तसेच पशुधन शेतीकडे घेऊन जात येत नसे. शेतकऱ्यांचा हा त्रास पाहून ग्रामपंचायतीने पाणंद रस्त्याचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंचायत समितीकडे केली होती. परंतु, त्यास प्रतिसाद मिळत नसे. त्यामुळे गावचे सरपंच गोरख सावंत यांनी सदरील रस्त्यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक घेऊन लोकसहभागातून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिला आहे.