गुरधाळ येथे पोकरा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:11+5:302021-07-20T04:15:11+5:30

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, रमेश अंबरखाने, पंचायत समिती सभापती डॉ. शिवाजी मुळे, कल्याण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ...

Commencement of orchard cultivation under Pokra scheme at Gurdhal | गुरधाळ येथे पोकरा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीस प्रारंभ

गुरधाळ येथे पोकरा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीस प्रारंभ

यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, रमेश अंबरखाने, पंचायत समिती सभापती डॉ. शिवाजी मुळे, कल्याण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश सुळे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याने फळबाग लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी पोखरा आणि मग्रारोहयोतून विविध प्रकारची फळबाग लागवड करता येते. कृषी विभागामार्फत अनुदानही दिले जाते. खड्डे खोदणे, कलम खरेदी करणे, कलम लागवड, ठिबक सिंचनासाठी लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत अनुदान दिले जाते. फळबागेतून चांगला आर्थिक फायदा होतो. त्यामुळे पारंपरिक शेतीला जोडून फळबाग लागवड करावी.

महेश तीर्थकर यांनी प्रास्ताविक केले. आत्मा योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नितीन दुरुगकर यांनी सूत्रसंचालन केले. तालुुुका कृषी अधिकारी संजय नाबदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मंजूरखाँ पठाण, विजय निटुरे, प्रसाद निटुरे, अजय निटुरे, राजकुमार भालेराव, अविनाश हेरकर, अमोल कांडगिरी, नागेश पटवारी आदी उपस्थित होते.

Web Title: Commencement of orchard cultivation under Pokra scheme at Gurdhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.