जिजामाता मार्केटमधील व्यापारी संकुलाच्या बांधकामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:30+5:302021-02-17T04:25:30+5:30

नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जिजामाता मार्केट परिसरात दीड कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलाच्या बांधकाम ...

Commencement of construction of commercial complex at Jijamata Market | जिजामाता मार्केटमधील व्यापारी संकुलाच्या बांधकामाला प्रारंभ

जिजामाता मार्केटमधील व्यापारी संकुलाच्या बांधकामाला प्रारंभ

नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जिजामाता मार्केट परिसरात दीड कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे.

या संकुलाच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी मुख्याधिकारी भारत राठोड, उपाध्यक्ष सुधीर भोसले, बांधकाम सभापती विक्रांत भोसले, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, शिक्षण सभापती नागेश आष्टुरे, नियोजन सभापती ॲड. सावन पस्तापुरे, नगरसेवक मंजूरखाँ पठाण, फैजुखाँ पठाण, श्रीरंग कांबळे, रामचंद्र मुक्कावार, निवृत्ती सांगवे, ॲड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, फैयाज शेख, साईनाथ चिमेगावे, रामेश्वर पवार, अनिल मुदाळे, नाना हाश्मी, आनंद बुंदे, लखन कांबळे, डॉ. चंद्रकांत कोठारे, रुपेंद्र चव्हाण, विलास शिंदे, इम्तियाज शेख, दीपक शिंदे, मारोती कोटलवार,पप्पू गायकवाड, नगर अभियंता श्री. काझी, श्री. झाडे आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष बागबंदे यांनी शहराच्या व्यापारात भर पडावी, व होतकरू व्यापाऱ्यांना व्यापार करण्याची सोय व्हावी या उद्देशाने हे व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. शहरात आणखीन दोन ते तीन ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून सुसज्ज असे व्यापारी संकुले उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Web Title: Commencement of construction of commercial complex at Jijamata Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.