आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:56+5:302021-05-05T04:32:56+5:30
यावेळी मनपातील अग्निशमन अधिकारी राधाकिशन कासले यांनी आगीचे कारण सांगताना जळणारी वस्तू, हवा आणि उष्णता या तीन गोष्टी एकत्रित ...

आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम
यावेळी मनपातील अग्निशमन अधिकारी राधाकिशन कासले यांनी आगीचे कारण सांगताना जळणारी वस्तू, हवा आणि उष्णता या तीन गोष्टी एकत्रित आल्याने आग लागते. आगीचे प्रकार पाच आहेत. त्यात सॉलीड फायर लाकूड, टायर ट्यूब, कचरा, फर्निचर इत्यादी वस्तूंचा समावेश असतो. वर्ग-२ मध्ये लिक्विड फायर पेट्रोल, डिझेल, केरोसीनचा समावेश असतो. तर तिसऱ्गा वर्गात एलपीजी, एसएनजी, मेटल फायर आणि इलेक्ट्रिकल फायर, शॉर्टसर्किटमुळे लागणाऱ्या आगी आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दाखविलेली ही रंगीत तालीम काळजीपूर्वक कर्मचाऱ्यांनी पाहिली. रुग्णालयात इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्वप्रकारची काळजी घ्यावी. जेणेकरून अशाप्रकारच्या दुर्घटनापासून बचाव होईल, असे यावेळी सांगण्यात आले.