जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरण, कंत्राटदाराला खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:38+5:302021-03-10T04:20:38+5:30

अहमदपूर येथील पाणीप्रश्न येत्या महिनाभरात सुरळीत न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा समजही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ...

The Collector slammed the Life Authority, the contractor | जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरण, कंत्राटदाराला खडसावले

जिल्हाधिकाऱ्यांनी जीवन प्राधिकरण, कंत्राटदाराला खडसावले

अहमदपूर येथील पाणीप्रश्न येत्या महिनाभरात सुरळीत न झाल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असा समजही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. लिंबोटी धरणावरुन १९ किलोमीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्यापही २५ टक्के शिल्लक राहिले आहे. त्याचबराेबर साठवण क्षमतेसाठी २१ लक्ष लिटर आणि ९ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे बांधकामही सुरु आहे. या कामातील प्रगती समाधानकारत नसल्याचा अहवाल नगर परिषदेने दिला आहे. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी थेट अहमदपूर शहराचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याने, यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबतची माहिती लपवली जात असल्याची तक्रार काही नगरसेवकांनी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पाणीपुरवठा अभियंता गणेशपुरी, कंत्राटदार यांची बैठक घेतली. बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदारास समाधानकारक उत्तर देता आले नाही. नगरपालिकेला अद्यापपर्यंत योजना हस्तांतरित झाली नाही. परिणामी, लवकर नगर परिषदेला ती हस्तांतरित करण्याबाबत खडसावले आहे. त्यातच ९ लाख ५० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे काम, जलशुद्धीकरणाची इनलेट, आउटलेट जोडणे, नवीन जल शुद्ध करण्याचे काम पूर्ण करणे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी एक महिन्याची डेडलाइन दिली आहे. एक महिन्यात काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येइल, असे सांगितले आहे. शहरात काही झोन मध्ये १० दिवसाआड पाणी तर काही झोन मध्ये तब्बल ४० ते ५३ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे नगरपरिषदेने नवीन पाइपलाईन टाकून नळजोडणी द्यावी, नागरिकांना नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

कंत्राटदार जुमानत नसल्याची तक्रार...

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वारंवार कंत्राटदारांना सूचना दिल्या आहेत. याबाबत त्यांच्या कामाचा वेग समाधानकारक नाही. याबाबी नगर परिषदेच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदार जुमानत नसल्यची तक्रार आता समाेर आली आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कायंदे एस.व्ही. म्हणाले.

नळजोडणीसाठी प्रस्ताव प्रलंबित...

नवीन पाईपलाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून, अहमदपूर येथील नागरिकांना नळ जोडणीसाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, औरंगाबाद यांच्याकडे प्रलंबित आहे. तो प्रस्ताव मान्य होताच योजनेतील शिल्लक रकमेतून प्रत्येक नागरिकांना नळजोडणी दिली जणार आहे, असे अहमदपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले.

Web Title: The Collector slammed the Life Authority, the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.