लातूर जिल्हा परिषदेत सीएमपी वेतन प्रणाली कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:02+5:302021-03-13T04:36:02+5:30
लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील ...

लातूर जिल्हा परिषदेत सीएमपी वेतन प्रणाली कार्यशाळा
लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शुक्रवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील सीएमपी वेतन प्रणालीद्वारे शिक्षण संवर्गातील वेतन अदा करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे पथक जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन प्रशिक्षण घेऊन आले होते. तद्नंतर याची सर्वाना माहीती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजरत्न जवळगेकर यांच्या सुचनेनूसार आयोजित कार्यशाळेत लेखाधिकारी सुर्यवंशी यांनी याबाबत सविस्तर माहीती दिली. प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी या वेतनप्रणालीचे फायदे सांगितले. दरम्यान, सीएमपी वेतन प्रणालीसाठी वित्त विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन लेखाधिकारी सुर्यवंशी यांनी दिली. यशस्वीतेसाठी समन्वयक माळी, दत्तात्रय शिरुरे, पाटील यांनी परिश्रम घेतले. आभार लखनगावे यांनी मानले.
वित्त विभागाचा पुढाकार...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके यांच्या संकल्पनेनुसार वित्त व लेखा विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन या प्रणालीबाबत अद्ययावत माहीती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सीएमपी वेतनप्रणाली लागु करण्यासाठी आग्रही असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजरत्न जवळगेकर यांनी सांगितले.