चाकूर तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:21+5:302021-03-15T04:18:21+5:30
चाकूर तहसील कार्यालय परिसरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. सुंदर कार्यालय... स्वच्छ कार्यालय... या उपक्रमासाठी दर महिन्याला असा एक दिवस ...

चाकूर तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता
चाकूर तहसील कार्यालय परिसरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. सुंदर कार्यालय... स्वच्छ कार्यालय... या उपक्रमासाठी दर महिन्याला असा एक दिवस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे हे स्वतः मुख्यालयी राहत असल्याने शासकीय निवासस्थानात अन्य कर्मचारी राहण्यास सुरुवात झाली आहे. तहसील कार्यालय, परिसर स्वच्छ झाला आहे. या उपक्रमांतर्गत शनिवारी सकाळी सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र आले. त्यांनी श्रमदानातून कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. यावेळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, नायब तहसीलदार प्रकाश धुमाळ, अव्वल कारकून गणेश विडीगोट्टी, पेशकार शिवाजीराव मुळे, मंडळ अधिकारी माणिक प्रभू बेजगमवार, एन.बी. केंद्रे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष अविनाश पवार, एन.जी. खंदाडे, पी.बी. तेरकर, के.एन. आरडले, एस.बी. लांडगे, बालाजी हाके, एम.एम. शेख, प्रमोद वंगवाड, डी.डी. तेली, दत्ता तेलंगे, सूर्यकांत महात्मे, विश्वनाथ हाके, निवृत्ती हालसे, नागेश तेलंग, गणेश चिंतनपल्ले आदी उपस्थित होते.
आपण ज्या कार्यालयात काम करतो, ते कार्यालय आणि त्याचा परिसर हा सुंदर व स्वच्छ ठेवायला पाहिजे. या मुख्य हेतूने सर्व कर्मचाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस श्रमदान हा पायंडा घालून घेतला आहे. चाकूर तालुक्यातील प्रत्येक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे म्हणाले.