नूतन सरपंचाचा स्वच्छता, पाण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST2021-03-14T04:19:18+5:302021-03-14T04:19:18+5:30

त्याचबराेबर गावाला पाणी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने ४० वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षी ...

Cleaning of the new Sarpanch, efforts for water | नूतन सरपंचाचा स्वच्छता, पाण्यासाठी प्रयत्न

नूतन सरपंचाचा स्वच्छता, पाण्यासाठी प्रयत्न

त्याचबराेबर गावाला पाणी उपलब्ध असूनही ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नियोजन न झाल्याने ४० वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात नव्हता. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये कोणाच्यातरी विहिरीचे अधिग्रहण करण्याची वेळ येत हाेती. आता सरपंच म्हणून पदभार स्विकारल्यावर नसरुद्दीन पटेल यांनी पहिल्यांदाच गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या बोअरची दुरुस्ती, गावाला वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सदरील ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच २४ वर्षांचा तरुण सरपंच मिळाला आहे. त्याचबराेबर सर्व सदस्य २४ ते ३५ वयाेगटातील आहेत. ग्रामपंचायतीच्या, गावाच्या विकासासाठी काम करतील, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. प्रत्येकवर्षी उन्हाळ्यामध्ये लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, आता ती थांबावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. गावच्या विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असल्याने स्वच्छतेचे कामही हाती घेतली आहे, असे सरपंच नसरुद्दीन पटेल यांनी सांगितले.

Web Title: Cleaning of the new Sarpanch, efforts for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.