ग्रीन लातूर वृक्ष टीमचा स्वच्छतेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:06+5:302021-02-15T04:18:06+5:30
स्वामी दयानंद विद्यालयात माता-पालक मेळावा लातूर : जेएसपीएम लातूरद्वारा संचलित स्वामी विवेकानंद कव्हा येथील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा ...

ग्रीन लातूर वृक्ष टीमचा स्वच्छतेचा उपक्रम
स्वामी दयानंद विद्यालयात माता-पालक मेळावा
लातूर : जेएसपीएम लातूरद्वारा संचलित स्वामी विवेकानंद कव्हा येथील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुणा कांदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नूतन सरपंच पद्मिन सोदले, देशमुख, कदम, मानकर, धामणगावे आदी उपस्थित होते. यावेळी दहावीच्या सराव परीक्षेचे पेपर उपस्थित पालकांना दाखविण्यात आले. पालकांच्या समोर पाल्यांकडून अडचणी जाणून घेतल्या.
श्री केशवराज विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : गुणवंतांची खाण म्हणून ओळख असलेल्या श्री केशवराज विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच डॉ. होमीभाभा, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार झाला. संस्थेच्या स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष यशवंतराव देशपांडे अध्यक्षस्थानी होते. स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाही जितेश चापसी, मुख्याध्यापक संजय विभुते, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिरूरे, धनंजय कुलकर्णी, प्राचार्य अमरजा कुलकर्णी, उपमु्ख्याध्यापक महेश कस्तुरे, शिवाजी हेंडगे आदींची उपस्थिती होती.
सैन्य भरती मेळावा घेण्याची मागणी
लातूर : जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राष्ट्रीय सुरक्षेच्या माध्यमातून नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, रोजगार मिळावा, यासाठी तिन्ही सैन्य दलांचे भरती मेळावे व्यापक स्वरूपात घेण्यात यावेत, अशी मागणी खा. सुधाकर ाश्रुंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी संरक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा कायम दुष्काळाच्या सावटाखाली असतो. त्यामुळे शेतीच्या माध्यमातून फारसे उत्पन्न मिळत नाही. परिणामी, तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. अशा स्थितीत सैन्य दलात नोकरी मिळावी, यासाठी जिल्ह्यात मेळावे घ्यावेत असे निवेदनात म्हटले आहे.
लातूरमध्ये ग्रीन व्हॅलेन्टाइन डे
लातूर : ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने शहरात व्हॅलेन्टाइन डे ग्रीन व्हॅलेन्टाइन डे म्हणून साजरा करण्यात आला. टीमच्या सदस्यांनी बाभळगाव रोडवरील शिक्षक कॉलनी परिसरात एकूण ३२ रोपांची लागवड केली. तसेच या झाडांना पाणी देण्यात आले. झाडांना फुगे बांधून झाडांवर प्रेम करावे, झाडांसोबत जगावे, निसर्गाचे आरोग्य जपा, झाडांना पाणी द्या, शहराचे आरोग्य जपा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. व्हॅलेन्टाइन डेपासून पुढच्या वर्षापर्यंत दररोज दहा वृक्षांना पाणी देण्याचा संकल्प ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीने करण्यात आला आहे.