अधिकचे मनुष्यबळ वापरून हमला पद्धतीने शहराची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:16+5:302021-09-02T04:42:16+5:30
पावसाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी पाणी साठते, गवत वाढते. यामुळे डासांची संख्या वाढते. या काळात साथ रोगांचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यूसारखे ...

अधिकचे मनुष्यबळ वापरून हमला पद्धतीने शहराची स्वच्छता
पावसाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी पाणी साठते, गवत वाढते. यामुळे डासांची संख्या वाढते. या काळात साथ रोगांचा प्रादुर्भाव होतो. डेंग्यूसारखे आजार डोके वर काढतात. असे होऊ नये यासाठी शहर स्वच्छतेबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहराची दैनंदिन स्वच्छता केली जात आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करून प्रत्येक घरातील ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता साथ रोग पसरू नयेत यासाठी मनपाने उपलब्ध मनुष्यबळासोबतच एक महिन्यासाठी अधिकचे मनुष्यबळ वापरून आक्रमकपणे स्वच्छता करून घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. मनपाकडे उपलब्ध असणारे आणि अधिकचे मनुष्यबळ एकत्रित करून एक विभाग निश्चित करावा. संपूर्ण मनुष्यबळ एकाच ठिकाणी वापरून त्या भागाची हमला पद्धतीने स्वच्छता करून घ्यावी. या पद्धतीने पुढील एक महिन्यात संपूर्ण शहर स्वच्छ करून घ्यावे. कोठेही कचरा राहू नये, पाणी साठून राहू नये आणि या माध्यमातून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दक्ष रहावे, अशाही सूचना आहेत.