नागरिकांनी नियमांचे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:30+5:302021-04-02T04:19:30+5:30
जळकोट शहरात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत १७४ पॉझिटिव्ह आढळून आले ...

नागरिकांनी नियमांचे पालन करावे
जळकोट शहरात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आतापर्यंत १७४ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील ३२ जण जळकोट शहरातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ६२४ बाधितांची नोंद झाली असून त्यातील ४९३ जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १७४ ॲक्टिव्ह रुग्ण असून १५ जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. ५० जण होम आयसोलेशनमध्ये असून ४७ जणांना उदगीर व लातूरला उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
वाढत्या संसर्गामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गृह विलगीकरणातील रुग्णांवर लक्ष केंद्रित करावे. चाचण्या वाढविण्यात याव्यात. तसेच ४५ वर्षांपुढील नागरिकांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे. मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा तसेच शासन नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी केले आहे.